उस्मानाबाद /प्रतिनिधी-  

 शिवसेनेची परंपरा असणाऱ्या शिवाजी पार्कवर होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी धाराशिव जिल्हा शिवसेनेच्यावतीने धाराशिव लोकसभा मतदार संघातील शिवसैनीकांसाठी “तुळजाभवानी एक्सप्रेस क्र. ००१८०” रेल्वेचे आयोजन केलेले असून उद्या दि. ०४/१०/२०२२ रोजी रात्री ठिक १.०० वाजता धाराशिव मतदार संघातील शिवसैनीकांनी रेल्वे स्टेशन, धाराशिव येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर, जिल्हाप्रमुख तथा आमदार  कैलास  पाटील, नगराध्यक्ष  मकरंद  राजेनिंबाळकर आणि जिल्हा शिवसेनेच्या वतीने करण्यात आलेले आहे. धाराशिव जिल्हा शिवसेनेच्या वतीने मागणी केल्यानुसार रेल्वेच्या पुष्ठी मंजुरीचे पत्र मध्य रेल्वेचे A.T.M. (COG.) ब्रजेश रॉय यांनी कळवल्याचे जिल्हा शिवसेनेच्या वतीने सांगण्यात आलेले आहे.

  गेल्या काही दिवसांपुर्वी घडलेल्या राजकीय गदारोळांपासुन राज्यातील असंख्य निष्ठावान शिवसैनीकांसह राज्यातील नागरीकांना दसरा मेळाव्याची प्रतिक्षा लागली असून पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांचे विचार आत्मसात करण्यासाठी राज्यातील शिवसैनीक आणि नागरीक उत्सुक आहेत. पक्षाच्या विचारांशी आणि पक्षाने मोठे केलेल्या पक्षनेतृत्वाशी प्रतारणा करून पक्षाला सोडून गेलेल्यांनी राज्यातील तमाम शिवसैनीकांचा अस्मिता असणाऱ्या दसरा मेळाव्याचे मैदान देखील शिवसेनेला मिळू नये म्हणून प्रयत्न केले मात्र अंतीमत: सत्याचा विजय होत असतो त्यामुळे मा.उच्च्‍ न्यायालयाने शिवसेनेचा दसरा मेळावा शिवातीर्थवरच होईल असा निकाल दिला आणि शिवसेनेची दसरा मेळाव्याची परंपरा अखंडीत सुरु राहण्याचा मार्ग सुकर झाला असून हा दसरा मेळावा खऱ्या अर्थाने स्वाभिमान, निष्ठा, संघर्ष आणि त्यागाचे प्रतिक असल्याचे सांगून या दसरा मेळाव्यासाठी धाराशिव लोकसभा मतदार संघातील जास्तीत जास्त नागरीकांनी पक्षप्रमुख   उद्धवजी ठाकरे यांचे  विचार ऐकण्यासाठी येण्याचे आवाहन खा. राजेनिंबाळकर यांनी केलेले आहे.

   शिवसेनेचा दसरा मेळावा ही आपली वैचारीक परंपरा असून पक्षप्रमुख  उद्धवजी ठाकरे यांच्या ज्वलंत धगधगत्या विचारांची शिदोरी घेण्यासाठी मोठ्या संख्येने येण्याचे आवाहन खा. राजेनिंबाळकर, आमदार श्री.घाडगे-पाटील, जिल्हाप्रमुख  गौतम लटके, नगराध्यक्ष  नंदु राजेनिंबाळकर यांनी केलेले आहे.


 
Top