उस्मानाबाद / प्रतिनिधी-

उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट गणेश मंडळ म्हणून, शहरातील गवळी गल्लीतील श्री बाल हनुमान गणेश मंडळ ,”मानाचा गणपती व धाराशिवचा महाराजा” यांचा सन्मान प्रमाणपत्र ,सन्मान चिन्ह व रोख रक्कम देऊन मुंबई येथे रवींद्र नाट्य मंदिरात अत्यंत भव्य आणि दिव्य भरगच्च कार्यक्रमात महाराष्ट्र शासनाचे सांस्कृतिक कार्य वने मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या शुभहस्ते देऊन करण्यात आला. 

यावेळी महाराष्ट्र सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय  पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी चे प्रकल्प संचालक संतोष रोकडे, सांस्कृतिक कार्य विभागाच्या उपसचिव विद्याताई वाघमारे यांच्या उपस्थितीत  सन्मान करण्यात आला गणेश मंडळाने 2022 मध्ये गणेशोत्सवातील विविध कार्यांचा आढावा व मंडळांनी हाती घेतलेले वैशिष्ट्यपूर्ण कार्य, सामाजिक, शैक्षणिक, क्रीडाक्षेत्र ,आरोग्य क्षेत्रात विविध अशा राष्ट्रीय व समाज उपयोगी कार्यामध्ये, सतत शासनाच्या विविध योजना व कार्यामध्ये खारीचा वाटा उचललेल्या, समाजातील ज्वलंत  समस्यांवर तत्परतेने  सेवाभाव कार्य करणारे मंडळ म्हणून सन्मान करण्यात आला. यावेळी मंडळाने महाराष्ट्राची परंपरागत वेशभूषा व मंडळाची गेली 58 वर्षापासून विविध गणेशोत्सवात व समारंभात पांढऱ्या गणवेशात, फेटे बांधून व गमजे घालून ही परंपरा आजही कार्यक्रमात केली. उठावदार व आकर्षक दिसत होती.  गणपती बाप्पा मोरया या घोषणाने हॉल दुमदुमला होता. आनंदीमय व प्रसन्नतेच्या वातावरणामध्ये सुरेख व सुंदर कार्यक्रम संपन्न झाला. पारितोषिक स्वीकारण्यासाठी मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते 25जन  उपस्थित होते .मंडळाने यावेळी  मान्यवरांचा श्री ची प्रतिमा सन्मानचिन्ह ,मंडळाचे गमजे व मंडळाच्या कार्यक्रम पत्रिका देऊन सन्मान करण्यात आला. काशिनाथ दिवटे,  ऍडव्होकेट अमोल दिवटे , संजय पाळणे, विश्वास दळवी, अश्विन हंचाटे ,डॉक्टर वेंकटेश हंचाटे  चित्रलेखा दिवटे, कुमारी श्वेता दिवटे, महेश सलगरे ,लल्ला चवंडके ,विद्या साखरे ,कुणाल दिवटे ,मनोज अंजी- खाने, मुझेमिल पठाण, डॉक्टर अमृत हंचाटे ,वीरभद्र हंचाटे, घुटे, भालचंद्र हुच्चे इत्यादीने सन्मान स्वीकारला.यावेळी महेश सलगर यांचा वाढदिवस नाट्य मंदिरात केक कापून साजरा करण्यात आला. वाढदिवसाच्या शुभेच्छा यावेळी देण्यात आले.  सिद्धिविनायक मंदिराचे ट्रस्टी श्री देशमुख यांनी मंडळाच्या या सर्व कार्यकर्त्यांना सिद्धिविनायकाचे खास दर्शन घडवून आणले यावेळी देशमुख यांनी मंडळाच्या कार्याविषयी व आपला आकर्षक गणवेश विषयी स्तुती करून सिद्धिविनायक  दर्शन व पूजाविधि करण्याचा मान मिळाला. श्री देशमुख यांचा सत्कार एडवोकेट अमोल दिवटे व सर्व कार्यकर्त्यांनी  गमजा व सन्मान चिन्ह देऊन करण्यात आला. यावेळी सिद्धिविनायकाच्या चरणी मंडळाचा गमजा अर्पण करून येथील पुरोहित व पुजाऱ्यांना ही मंडळाने सन्मानित केले .यावेळी या मंदिराच्या बाहेर तीन चाकी सायकल वर बसून दर्शनास आलेल्या दिव्यांगास  “पार्थ मोदी” मंडळाच्या कार्यकर्त्यांनी त्यास गाडीमध्ये बसविण्यासाठी पालकांना कार्यकर्त्यांनी मदत केली. व मंडळाने या दिव्यांगास गमजा देऊन मुलगा व पालक यांचाही सन्मान केला. मंडळाचे पालकांनी आभार व्यक्त केले. मंडळाचे कार्यकर्ते व पदाधिकारी सेवाभावी वृत्तीने कार्य करण्यामुळे हा सन्मान मिळत गेला हे आवर्जून येथे उल्लेख करावा लागेल. मंडळाच्या प्रतिक्रिया , आपले मनोगतात व्यक्त करण्यासाठी मंडळाचे संयोजक भालचंद्र हुच्चे यांना मिळाला  या मंडळाचे कार्य पारितोषकाचा संदेश यावर आपले विचार मांडले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्याताई वाघमारे उपसचिव सांस्कृतिक कार्य विभाग यांनी केले व संतोष रोकडे प्रकल्प संचालक पु ल देशपांडे कलाकादमी यांनी आभार मानले.मंडळाचे कौतुक व अभिनंदन विविध क्षेत्रातून केले जात आहे. 

 
Top