उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 शहरातील उद्योजक भन्साळी परिवारातील अक्षय श्यामसुंदर भन्साळी यास पुणे येथील यशवंतराव चव्हाण सभागृह कोथरुड पुणे येथे आयोजित पुणे महानगरपालिका व प्रशांत दामले फॅन टी स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने ३ महिन्याच्या प्रशांत दामले टी स्कुल मध्ये गायन ,नृत्य, अभिनय आदि साठी दिले जाणाऱ्या प्रशिक्षणासाठी श्रीपतराव भोसले विद्यालयात शालेय शिक्षण घेऊन उच्च शिक्षण उडपी येथे घेऊन बालपणा पासुन गायन करित असुन पुढील कला क्षेत्रातील प्रशिक्षणासाठी पुणे येथे कला क्षेत्रात नवी पिढी निर्माण होण्यासाठीच अनेक दशके ज्यांनी रंगभूमी चित्र सृष्टीत ख्याती असलेले अभिनेते प्रशांत दामले यांनी या टी स्कूलची सुरुवात केली त्याच टी स्कूल मधील प्रशिक्षणार्थीचा दर्जेदार दिमाखदार सादरणीकरण सोहळ्यात  ‘ प्रशांत दामले टी स्कूल शिष्यवृत्ती ‘ प्रशांत दामले यांचे हस्ते प्रदान करण्यात आली स्वरूप असे की चापुढे होणाऱ्या प्रशिक्षणार्थी     सादरीकरणात प्रत्येक वेळी सहभागी होता येणार या पूर्वी उस्मानाबादचा आकाश अरविंद पाटील सुद्धा शिष्यवृत्ती धारक असुन  आणखी एक अक्षय भन्साळीने उस्मानाबाद च्या शिरपेचात मानाचा तुरा लावून पुण्या सारख्या ठिकाणी उस्मानाबाद च्या भुमीपुत्रांने लौकीक वाढविला याचा उस्मानाबादकरांना सार्थ अभिमान आहे. 

या सोहळ्यासाठी आवर्जून अक्षयचे कलाशिक्षक शेषनाथ केशरबाई दगडोबा वाघ , वडील तथा संस्कार भारती         जिल्हाध्यक्ष श्यामसुंदर नंदकिशोर भन्साळी आई ज्योती भन्साळी, आजी मधु श्रीकिशन भन्साळी, भगिनी श्रेया विजयकुमार भन्साळी, संस्कार भारती जिल्हा कोषप्रमुख अरविंद पाटील, सौ. आरोही आकाश पाटील उपस्थित होते. आकाश ,अक्षय नावाजलेली प्रशांत दामले टी स्कूल शिष्यवृत्ती मिळाल्या बद्दल उस्मानाबाद शहरातील सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदन होत आहे . 

 
Top