उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर,शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार कैलास पाटील,माजी नगराध्यक्ष नंदूभैय्या राजेनिंबाळकर व शिवसेना ज्येष्ठ नेते माजी नगराध्यक्ष दत्ता बंडगर यांच्या मार्गदर्शनाने उस्मानाबाद येथे मोरवे बिल्डिंग चौकामध्ये ईद-ए-मिलाद निमित्त मुस्लिम बांधवांसाठी शिवसेना- युवासेना व शिवसैनिक दिनेश बंडगर यांच्या वतीने जुलूस मध्ये सहभागी मुलांना, मुलींना, युवकांना व नागरिकांना मिठाई वाटप करून सर्वांचे तोंड गोड करण्यात आले व सोबत पाणी बॉटल चे वाटप करण्यात आले.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गफूर शेख, महेश देवकते, सुधीर अलकुंटे,कलीम कुरेशी, मुजीब काझी,बालाजी कांबळे, रवी वडणे,विजय आव्हाड ,बाळकृष्ण साळुंखे,टायगर सोशल ग्रुपचे अध्यक्ष गौसभाई तांबोळी,आसिफ तांबोळी,नदाफ निजाम,सतीश लोंढे,बबलू राऊत,अजय विंचुरे,सुमित जानराव, असद रझवी,सिद्धीक तांबोळी,शरीफ शेख, रियाझ शेख, मोहसीन शेख,मुबारक शेख, नवाज शेख,अमन शेख, सद्दाम शेख,राकेश सूर्यवंशी, उमर शेख, अझहर शेख,प्रदीप वाघमोडे,प्रसाद शिंदे, बाप्पा कांबळे इत्यादी सर्वांनी परिश्रम घेतले.


 
Top