उस्मानाबाद / प्रतिनिधी-

येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या रामकृष्ण परमहंस महाविद्यालयातील मयत कर्मचारी अशोक भोसले यांचे बारा लाख रुपयाचे कर्ज माफ करून 80 हजार रुपये रकमेचा धनादेश श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे मराठवाडा विभाग प्रमुख तथा महाविद्याचे प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख, पतसंस्थेचे विभागीय चेअरमन लक्ष्मण महानवर, शाखाधिकारी जीवन माने यांच्या हस्ते देण्यात आला 

    श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादित कोल्हापूर, विभागीय कार्यालय उस्मानाबाद येथून एकूण बारा लाख रुपयांचे कर्ज घेतलेले होते. सदर कर्मचाऱ्यांने स्टेट बँक ऑफ इंडिया चा लाइफ इन्शुरन्स कर्जावर घेतलेला होता. परंतु सदर कर्मचाऱ्याचा आकस्मिक मृत्यू झाल्याने कर्जाची एकूण बारा लाख रुपये रक्कम माफ करून 80 हजार रुपयांचा धनादेश सदर कर्मचाऱ्याच्या पत्नी व मुलास सुपूर्द करण्यात आला. यावेळी पतसंस्थेतील लिपिक अनिल जाधव आणि सेवक बिभीषण डिकोळे उपस्थित होते.


 
Top