तुळजापुर/प्रतिनिधी 

कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पासाठी 11 हजार 726 कोटी  रुपये मंजूर करण्याचा  राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. यामुळे उस्मानाबाद जिल्हयास मिळणाऱ्या सात टीएमसी पाण्याचा मार्ग मोकळा झाला असुन  सात टीएमसी पाणी जिल्हयात  २०२४पर्यत आणण्याचा प्रयत्न राहणार असुन राज्य सरकारने हा घेतलेला निर्णय म्हणजे विजयादशमी पुर्वसंध्येला जिल्हयाला मिळालेली गुड न्युज असुन या निर्णयामुळे मराठवाड्यावर झालेला अन्याय दूर होणार  असुन यासाठी मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे व  उपमुख्यमंञी देवेंद्र फडणवीस यांनी मोलाची भूमिका बजावल्याची माहीती आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी मंगळवार दि. ४रोजी  पञकार परिषद घेवुन दिली .

यावेळी पञकारांशी संवाद साधताना पाटील पुढे म्हणाले की, माजी  मंञी डाँ. पद्मसिंह पाटील हे पाटबंधारे मंञी असताना मराठवाड्याला २१ टीएमसी पाणी देण्याचा निर्णय घेतला गेला परंतु या कामाला गती मिळाली नाही.

 राज्यसरकारने ११७२६ कोटी रुपये सुधारीत प्रस्ताव मंजुर केल्याबद्दल जिल्हा व आष्टी भागातील जनतेच्या वतीने मी मुखमंञी एकनाथ शिंदे व उपमुखमंञी देवेंद्र फडणवीस यांचे  आभार मानतो या कामाला मागील तीन वर्षात गती नव्हती माञ आता सात टीएमसी पाणी जिल्हयाला मिळणार असुन हे काम २०२४ पर्यत पुर्ण होवुन पहिल्या टप्प्यातील ३३००० हेक्टर क्षेत्र  जमिन ओलितीखाली येणार आहे. यासाठी ७ हजार कोटी रुपये लागणार असुन सरकार लवकर निधी उपलब्ध करुन देणार असल्याचे यावेळी स्पष्ट केले.एक महिन्यात काम चालु करणार असल्याचे यावेळी ते म्हणाले .

 मंत्रीमंडळाने 11 हजार 726 कोटीच्या कामांना जलसंपदा विभागाने मंजूर  दिल्याने मराठवाड्याच्या हक्काचे पाणी मिळण्याचे स्वप्न पूर्णत्वास  जाणार आहे.   उस्मानाबाद जिल्हयातील ८ व बीड जिल्ह्यातील १ असे एकुन  ९ तालुक्यातील १३३गावांना  पाणी मिळणार आहे यात सिंचन योजना  क्रमांक १ व २ मध्ये जिल्हयातील आठ तालुक्याचा समावेश आह. प्रशाद योजनेचे काम प्रगती पथावर यंदा पासुन श्रीतुळजाभवानी मातेच्या शाकंभरी नवराञोत्सवात होत असलेला श्रीतुळजाभवानी सांस्कृतिक कला क्रिडा महोत्सव चालु करुन तुळजाई स्ञी शक्ती पुरस्कार पुन्हा चालु करणार असल्याचे यावेळी म्हणाले .

यावेळी नितीन काळे, माजी नगराध्यक्ष सचिन रोचकरी, तालुकाध्यक्ष संतोष बोबडे,  विजय शिंगाडे, गणेश सोनटक्के, राहुल पाटील, आनंद कंदले आदी उपस्थितीत होते.


 जिल्हाला पाणी मिळणे महत्त्वाचे -माजी आ. चव्हाण 

 कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पासाठी 11 हजार 726 कोटी  रुपये मंजूर करण्याचा  राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्वपूर्ण निर्णयावर प्रतिक्रिया देताना माजी मंञी माजी आ. मधुकर चव्हाण म्हणाले  की, सर्व काही सोडा पण जिल्हयाला  दुष्काळ भागाला पाणी मिळणे महत्वाचे आहे.त्यामुळे पाणी आले तर चांगलेच आहे, अशी प्रतिक्रिया दिली. 



उस्मानाबादेत भाजपकडून जल्लोष 

कृष्णा-मराठवाडा सिंचन प्रकल्पासाठी ११७२६.९१ कोटींची तरतूद केल्याबद्दल भाजपच्यावतीने जल्लोष करण्यात आला. यावेळी यावेळी शहराध्यक्ष राहुल काकडे, ऍड. खंडेराव चौरे, पांडुरंग लाटे, विनायक कुलकर्णी, अभय इंगळे,  सचिन तावडे, संदीप इंगळे, वैभव हंचाटे, प्रवीण पाठक, सुजित साळुंके, दिनेश पवार, सार्थक पाटील, आशिष येरकळ, सुजित उंबरे, प्रसाद मुंडे, धनराज नवले आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.

 

 
Top