परंडा /प्रतिनिधी -

 महात्मा गांधीजी जयंती  निमित्त इन्स्टिटयूट ऑफ शोतोकान कराटे  डो युनाइटेड यांच्या वतीने पुणे येथे नेहरू नगर येथे घेण्यात  आलेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत चेथील संतमीरा पब्लिक स्कूल शाळेतील कु.ओमराजे हरिदास भिल्लारे (इ.८वी) व शशांक शहाजी चंदनशिवे (इ.९ वी )यांनी आपापल्या वयोगटातुन प्रथम क्रमांक पटकावले आहे. वरील दोन्ही विद्यार्थ्यांची गुजरात राज्यातील  अहमदाबाद येथे होणाऱ्या नॅशनल कराटे स्पर्धेसाठी निवड झाली आहे.या  विद्यार्थ्यांना संतोष शिंदे व पांडुरंग  ठोसर  यांचे मार्गदर्शन लाभले.

यशस्वी विद्यार्थ्यांचा शाळेचे प्राचार्य संतोष भांडवलकर यांनी  सत्कार केला यावेळी पालक सचिन हिगणकर, मंजूर मुजावर, इम्रान पठाण, सचिन झोरे इ तर  शाळेतील सर्व शिक्षक,  शिक्षिका, कर्मचारी, विद्यार्थी व पालक   उपस्थित होते.शाळेचे संस्थापक डॉ.प्रतापसिंह पाटील , उपाध्यक्ष तथा आमदार डॉ.राहुल पाटील, सचिव डॉ.उदयसिंह पाटील, डॉ.शिल्पा पाटील मॅडम  यांनी  अभिनंदन व कौतुक करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.


 
Top