उस्मानाबाद /प्रतिनिधी-

 50 हजार रुपये लाचेची मागणी करुन 40 हजार रुपये घेताना एका अधिकार्‍यास उस्मानाबाद लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली आहे. कळंब भूमी अभिलेख कार्यालयातील भुमापक प्रशांत अरुणकुमार खरात याला पोलिसांनी अटक केली आहे.

तक्रारदार यांनी त्यांच्या वडिलांच्या नावे असलेल्या जमिनीची लवकरात लवकर मोजणी करून हद्द कायम करून नकाशा देण्यासाठी आरोपी लोकसेवक प्रशांत अरुणकुमार खरात याने 50 हजार लाचेची मागणी करुन 40 हजार घेतले.

सापळा अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक विकास राठोड यांच्या पथकाने ही कारवाई केली. पोलीस अधीक्षक डॉ राहुल खाडे, अपर पोलीस अधीक्षक विशाल खांबे, पोलीस उपअधीक्षक प्रशांत संपते यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. सापळा पथकात पोलीस अंमलदार मधुकर जाधव, विष्णू बेळे ,  सचिन शेवाळे, चालक दत्तात्रय करडे यांनी काम पहिले

 
Top