उस्मानाबाद /प्रतिनिधी -

खरीप २०२० पिक विम्यापोटी मा. सर्वोच्च न्यायलयात जमा असलेले रू. २०० कोटी व त्यावरी व्याज रू. १ कोटी ३४ लक्ष असा एकूण रू. २०१.३४ कोटी रक्कमेचा धनाकर्ष  जिल्हा अधिक्षक  कृषी अधिकारी उस्मानाबाद यांच्या नावे आज प्राप्त झाला आहे.  आपल्या विनंतीवरून सर्व प्रक्रिया पुर्ण करून घेण्यासाठी जिल्हा अधिक्षक  कृषी अधिकारी श्री. तिर्थकर मागील आठवडाभर दिल्लीत ठाण मांडून होते. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच अशाप्रकारे पिक नुकसानीची विमा भरपाई जिल्हाधिकारी यांच्या मार्फत वर्ग करण्यात येत आहे. वसूबारसेच्या पुर्वसंध्येला धाराशिवकरांसाठी  हि आणखीन एक आनंददायी बाब आहे. उद्या हा धनाकर्ष खात्यावर जमा करून लवकरात लवकर नुकसान भरपाईची रक्कम शेतक-यांच्या खात्यावर वर्ग करण्याचा प्रयत्न राहणार आहे.  असल्याची माहीती आ.राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे

खरीप २०२० मध्ये झालेल्या नुकसानीपोटी शेतक-यांना जवळपास रू. ५३१ कोटी भरपाई देणे अपेक्षीत आहे. त्यामुळे उर्वरीत आवश्यक रक्कम विमा कंपनी व विमा कंपनीचा केंद्र व राज्य सरकारकडे बाकी असलेला दुसरा हप्ता, यातून प्राप्त करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.  या अनुषंगाने आज जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करण्यात आली आहे.

विमा कंपनीच्या मनमानी कारभारामुळे खरीप २०२० प्रधानमंत्री फसल बीमा योजने अंतर्गत केंद्र व राज्य सरकारचा अंदाजे रु. २०० कोटीचा विमा कंपनीला देय्य दुसरा हप्ता रोखण्यात आला आहे. मा. सर्वोच्च न्यायलयाच्या आदेशाचे पालन करण्याच्या अनुषंगाने उर्वरीत रक्कमेची तरतुद करणे आवश्यक आहे. त्यामुळे केंद्र व राज्य सरकारकडे दुस-या हप्त्यापोटी बाकी असलेले अंदाजे रू. २०० कोटी  जिल्हाधिकारी यांच्या नियंत्राखाली उपलब्ध करून घेण्याच्या अनुषंगाने प्रधान सचिव कृषी यांना विनंती करण्याची मागणी आज जिल्हाधिकारी  धाराशिव यांच्याकडे करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे विमा कंपनीकडून आदेशाची अंमलबजावणी होत नसल्यास मा. सर्वोच्च न्यायालयाला याबाबतची रितसर माहिती देण्याच्या सुचना त्यांना करण्यात आल्या आहेत.

याकामी केंद्रीय नेतृत्वासह मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कृषीमंत्री,जिल्हाधिकारी यांचे बहूमोल सहकार्य लाभले, त्याबददल आभार. त्याचबरोबरोबर जिल्हा अधिक्षक  कृषी अधिकारी श्री. तिर्थकर यांनी घेतलेल्या मेहनतीबदल त्यांचे देखील विशेष आभार जिल्हावासीयांच्या वतीने व्यक्त करण्यात येत आहे.

 
Top