उस्मानाबाद /प्रतिनिधी -

उस्मानाबाद येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांतर्गत खाजगी वाहतूक दारांनी निर्धारित दरापेक्षा अधिक भाडे आकारल्यास त्यांच्यावर तरतूदीनुसार कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांनी दिले आहेत.

                 त्याअनुषंगाने राज्यमार्ग परिवहन महामंडळाने त्या-त्या संवर्गातील वाहनांसाठी भाडेदर निश्चीत केला आहे. सद्य:स्थितीचे भाडेदर विचारात घेवून खाजगी बसेससाठी प्रती कि.मी.भाडेदराच्या 50 टक्के पेक्षा अधिक राहणार नाही असे कमाल भाडेदर शासनाने दि.27 जुलै 2018 ला निश्चीत केले आहेत. त्यानुसार शासन निर्णयाप्रमाणे कंत्राटी परवाना वाहनाचे प्रती बस, प्रती कि.मी., प्रती आसन कमाल भाडे (रा.प.मंडळाचे भाडे अधिक 50 टक्के धरुन) मार्गदर्शक भाडेदर पुढीलप्रमाणे आहेत.

                   उस्मानाबाद ते पुणे पर्यंत विनावातानुकूलीत शयनयान आसनी दिडपट भाडे 885 रुपये, वातानुकूलीत आसनी दिडपट भाडे 970 रुपये आणि वातानुकूलीत शयनयान दिडपट भाडे 1045 रुपये. उस्मानाबाद ते मुंबई  पर्यंत विनावातानुकूलीत शयनयान, आसनी दिडपट भाडे 1410 रुपये, वातानुकूलीत आसनी दिडपट भाडे 1540 रुपये आणि वातानुकूलीत शयनयान दिडपट भाडे 1665 रुपये. उस्मानाबाद ते कोल्हापूर पर्यंत विनावातानुकूलीत शयनयान, आसनी दिडपट भाडे 1080 रुपये, वातानुकूलीत आसनी दिडपट भाडे 1180 रुपये आणि वातानुकूलीत शयनयान दिडपट भाडे 1275 रुपये. उमरगा ते मुंबई पर्यंत विनावातानुकूलीत शयनयान, आसनी दिडपट भाडे 1630 रुपये, वातानुकूलीत आसनी दिडपट भाडे 1780 रुपये आणि वातानुकूलीत शयनयान दिडपट भाडे 1920 रुपये. उमरगा ते पुणे पर्यंत विनावातानुकूलीत शयनयान आसनी दिडपट भाडे 1170 रुपये, वातानुकूलीत आसनी दिडपट भाडे 1260 रुपये आणि वातानुकूलीत शयनयान दिडपट भाडे 1345 रुपये. तुळजापूर ते मुंबई पर्यंत विनावातानुकूलीत शयनयान आसनी दिडपट भाडे 1480 रुपये, वातानुकूलीत आसनी दिडपट भाडे 1585 रुपये आणि वातानुकूलीत शयनयान दिडपट भाडे 1690 रुपये. तुळजापूर ते पुणे पर्यंत विनावातानुकूलीत शयनयान, आसनी दिडपट भाडे 955 रुपये, वातानुकूलीत आसनी दिडपट भाडे 1005 रुपये आणि वातानुकूलीत शयनयान दिडपट भाडे 1065 रुपये. कळंब ते मुंबई पर्यंत विनावातानुकूलीत शयनयान, आसनी दिडपट भाडे 1600 रुपये,  वातानुकूलीत आसनी दिडपट भाडे 1710 रुपये आणि वातानुकूलीत शयनयान दिडपट भाडे 1855 रुपये. परंडा ते पुणे पर्यंत विनावातानुकूलीत शयनयान आसनी दिडपट भाडे 810 रुपये, वातानुकूलीत आसनी दिडपट भाडे 835 रुपये आणि वातानुकूलीत शयनयान दिडपट भाडे 1000 रुपये याप्रमाणे भाडेदर असणार आहेत.

     याबाबत प्रवाशांची काही तक्रार असल्यास नोडल ऑफीसर मोटार वाहन निरीक्षक प्रशांत भांगे (संपर्क क्र. 02472-229455, मो.9137020399) ई-मेल आयडी dyrto.25-mh@gov.in./ dycommr.enf2@gmail.com या ठिकाणी तक्रार नोंदविता यईल. तक्रार नोंदविताना पुरावा म्हणून प्रवाशाने त्यांच्याकडील तिकिटाची प्रत सोबत जोडणे आवश्यक आहे. असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी केले आहे. 

                   

 
Top