तुळजापूर / प्रतिनिधी-

येथील भवानी रोड वरील ‘श्री ट्रेडर्स’ या नारळ विक्री दुकानावर पोलीस व नगरपरिषद यांनी संयुक्त छापा मारून सोललेल्या नारळाची 35 गोणी जप्त केली 

  सदर कार्यवाही उपविभागीय पोलीस अधिकारी   सई भोरे पाटील यांच्या नेतृत्वात नगरपरिषद कार्यालयाचे कार्यालय अधीक्षक वैभव पाठक,  स्वच्छता निरीक्षक दत्ता साळुंखे व इतर सफाई कर्मचारी व पोलीस यांच्या उपस्थितीत करण्यात आली. यावेळी जप्त करण्यात आलेल्या सोललेल्या नारळाची बाजारातील किंमत 32 हजार 400 इतकी आहे. तरी तुळजापूर शहरातील व्यापाऱ्यांनी सोललेल्या नारळाची विक्री करू नये, असे आवाहन  उपविभागीय पोलीस अधिकारी सई भोरे पाटील व मुख्याधिकारी  अरविंद नातू यांनी तुळजापूर येथील व्यापाऱ्यांना केलेले आहे.

 
Top