तुळजापूर / प्रतिनिधी-

 महाराष्ट्रातील   पहिल्या सौर ऊर्जा वर चालणाऱ्या नगर पालिका शाळा क्रमांक 3 तुळजापूर खुर्द शाळेतील सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन शिक्षक दिनाचे औचित्य साधून नगर परिषद शाळा क्रमांक 3 तुळजापूर (खुर्द) या शाळेत  मुख्याधिकारी   अरविंद नातू यांच्या हस्ते करण्यात आले.

 यावेळी  माजी नगराध्यक्ष श्री.सचिन रोचकरी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तर माजी शिक्षण सभापती मंजुषाताई देशमाने, माजी नगसेवक पंडितराव जगदाळे, तुळजाई नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन श्री. राजाभाऊ देशमाने,तुळजापूर नगर पालिकेचे कार्यालयीन अधीक्षक श्री.वैभव पाठक, विद्युत अभियंता श्री. सुशील सोनकांबळे, श्री.अशोक सनगले यांची उपस्थिती कार्यक्रमास होती.

   नगर पालिका शाळा क्रमांक 3 तुळजापूर (खुर्द )च्या शाळेत सर्व वर्गातील विद्युत दिवे, पाणी फिल्टर, विद्युत पंखे, शाळेतील स्मार्ट टीव्ही, एल ई डी प्रोजेक्टर, स्मार्ट बोर्ड असे सर्व विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण देणारी अत्याधुनिक विद्युत उपकरणे यापुढे सौर ऊर्जेवर चालतील.

नगर परिषद प्राथमिक शाळा क्रमांक 3 तुळजापूर (खुर्द)  शाळेला या पूर्वी सर्वांगीण शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्रमात ‘उत्कृष्ट शाळा’हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. तसेच मराठवाड्यातील पहिली ISO मानांकन प्राप्त करणारी नगर पालिका शाळा हा बहुमान ही शाळेने मिळविलेला आहे. 

   एकीकडे जिल्हा परिषद शाळेच्या आणि नगर पालिकेच्या शाळेची पटसंख्या कमी होत असताना नगर पालिका शाळा क्रमांक 3 तुळजापूर खुर्द च्या शाळेत प्रवेशासाठी प्रतीक्षेत थांबावे लागते.

 
Top