तुळजापूर   / प्रतिनिधी- 

 शांतिनाथ दिगंबर जैन मंदिराच्या वतीने पर्युषण पर्वानिमित्त शहरातून जलकुंभ मिरवणूक (पालखी सोहळा)  उत्साहात साजरा करण्यात आला. 

जलकुंभ  मिरवणूकीस  आरंभ आर्य  चौकातुन करण्यात आला. त्यानंतर या मिरवणुकीची  लोहिया मंगल कार्यालयामध्य सांगता झाली. वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. या कार्यक्रमात सहभागी कल्पना सोलापुरे, श्रद्धा शेटे, ऐश्वर्या व्यवहारे, अंकिता सोलापूर, पौर्णिमा किवडे .प्रणिता राव. गौरी शेटे. श्रावणी शेटे, कुमारी माही शेटे, संस्कृती राव, समीक्षा मैंदर्गे ,नम्रता डोळ, नंदिनी डोळ, आयुषी व्यवहारे ,श्रेयांशी रोकडे यांनी सादरीकरण केले.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सौ. मनीषा व्यवहारे, सौ वैशाली व्यवहारे,  पद्मजा वराडे, सुनंदा रोकडे, रेखा काटकर, जयश्री कंदले ,ज्योती मेहता आदींनी परिश्रम घेतले. पर्युषण पर्वानिमित्त उपवास केलेल्या महिलांचा महिला मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला. इंद्र इंद्रायणीचा मान सौ श्रद्धा पलाश शेट, पलाश शेटे यांना मिळाला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. वैशाली गुलचंद व्यवहारे यांनी केले.

याप्रसंगी उपस्थित सुभाषराव शेटे, अरुण काका  कंदले, विलासराव रोकडे, चंद्र वदन शेटे, विजय कंदले, भास्कर किवडे फुलचंद व्यवहारे, संजय मैंदर्गी, बाळासाहेब मैंदर्गी, चिंतामणी भांबरे, सुधाकर शेटे गुलचंद व्यवहारे विचंद्र दुरुक्कर, सचिन दुर्गकर , प्रवीण दुर्गकर ,प्रमोद शेटे, नंदकुमार गाडे, संतोष शेटे, अनिल सोलापुरे ,सुनील सोलापुरे ,योगेश शेटे, विशाल शेटे पद्माकर राव शांती भूषण  रोकडे अदिसह जैन समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थितीत होता. 


 
Top