तुळजापूर  / प्रतिनिधी-

श्रीतुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्री निमित्त बुधवार दि .२८रोजी  श्री तुळजाभवानी मंदिरात व संपुर्ण मंदीर परिसरात आकर्षक अशी   फुलांची आरास करण्यात करण्यात आली आहे. 

यात पिंपळ पारावर आकर्षक फुलांची  देविजींची  मुर्ती साकारली होती. फुलांन मधील देवि पाहुन भाविक नतमस्तक होत होता.  यामुळे श्रीतुळजाभवानी मातेचे  दर्शन घेण्यासाठी आलेल्या भाविकांमधून ही मनमोहक आरास पाहून समाधान व्यक्त केले जात आहे . 

  नवरात्र महोत्सवानिमित्त सध्या दररोज  श्री तुळजाभवानी  मंदिरात सेवा म्हणून भाविक  देशी-विदेशी  फुलांची आकर्षक आरास  सजावट करण्यासाठी भाविक उत्सुक असतात . भाविकांकडून पाना फुलांचा व डेकोरेटर्सचा खर्च करत मोफत सेवा दिली जाते.   श्री तुळजाभवानी  मातेचे हे सजलेले अनोखो रुप पाहण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक तुळजाई नगरीत  देविच्या दर्शनासाठी गर्दी करत आहेत . श्रींदेविजींच्या दर्शनाकरीता आलेल्या भाविकानां मंदिरात करण्यात आलेल्या मनमोहक आरासाचे दर्शन घडत असल्याने तो मनोमनी सुखावले जात आहेत .


 
Top