तुळजापूर  / प्रतिनिधी-

 उस्मानाबाद सोलापूर  व लातूर या तीन जिल्ह्यामधील एकुण 13 तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या विश्वासाचा मंगरुळ येथील कंचेश्व़र साखर कारखान्याचा आठवा बॉयलर अग्नी प्रदिपन सोहळा कारखान्याचे मार्गदर्शक माजी आमदार दिलीपराव माने यांच्या हस्ते संपन्ऩ झाला. या गळीत हंगामात 7 लाख मे. टन ऊसाचे गाळप करण्याचा मानस यावेळी त्यांनी व्यक्त़ केला.

 तुळजापुर तालुक्यातील मंगरुळ येथील कंचेश्व़र साखर कारखान्याचा सन 2022-23 आठवा बॉयलर अग्नी प्रदिपन सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष पृथ्वीराज माने, जनरल मॅनेजर लक्ष्म़ण गाडे,मुख्य कार्यकारी अधिकारी संजय जाधव, शेती विभागाचे जनरल मॅनेजर अर्जुन बाराते. चिफ केमीस्ट़ सुंदर सांळुखे, डिस्टलरी इनचार्ज उत्तम़ रायकर,बाबासाहेब पाटील, बाळासाहेब काळे,धुळा शेंबडे, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. 

 सोलापूर जिल्हयातील 4, उस्मानाबाद तालुक्यातील 8,लातुर तालुक्यातील 1 याप्रमाणे 13 तालुक्यातील ऊस उत्पादकांचा ऊस आपण गाळप करीत आहोत. यावर्षी ऊस तोड यंत्रणेचे नियोजन केले असून 15 हार्वेस्ट़र, 250 ट्रक-टॅक्ट़र, 150 मिनी टॅक्ट़रचे सहाय्याने सन 2022-23 या गळीत हंगामात 7 लाख मे. टन ऊसाचे करण्याचा मानस माजी आमदार दिलीपराव माने यांनी व्यक्त़ केला.


 
Top