उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 भव्य आणि दिव्य राष्ट्र निर्मिती, महासत्ताक राष्ट्र आत्मनिर्भर राष्ट्रासाठी शिक्षकांनी योगदान द्यावे ,असे  चेअरमन अरविंद दादा गोरे यांनी मत मांडले. 

श्री बाल हनुमान गणेश मंडळ, गवळी गल्ली, येथे मानाचा गणपती- धाराशिवचा महाराजा यांच्या श्रीच्या पूजा विधी अरविंद गोरे यांच्या हस्ते झाली. यावेळी ते बोलत होते.  दरम्यान मंडळाच्या श्री ची पूजा विधि व आरती व शास्त्रोक्त मंत्रोच्चारण काशिनाथ दिवटे यांच्या मंजुळ आवाजात सवाद्य ढोल ताशा घंटी यांच्या निनादात व प्रसन्नतेच्या वातावरण संपन्न झाली.

 यावेळी अणदूरचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक मारुती खोबरे ,  सेवानिवृत्त शिक्षक भालचंद्र पोतदार,   आदर्श शिक्षक  एन बी देशमुख, बाळासाहेब जमाले ,  अॅड.अमित मुंडे,  राजकुमार कुंभार ,  रणजीत ठाकूर,  अंकुश गायकवाड.,  नारायण बागल., अॅड. अजित खोत ,  दत्ता कुलकर्णी या सर्वांचा सन्मान गोरे यांच्या हस्ते व प्राध्यापक गजानन गवळी, मनमत   पाळणे, राजकुमार दिवटे विष्णुदास सारडा, विद्या साखरे काशिनाथ दिवटे  नंदकुमार गुच्छ,  पठाण , प्रमोद खंडेलवाल यांच्या शुभहस्ते करण्यात आला.

 या सर्व कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंडळाचे सर्व लहानथोरांचे परिश्रम आहेत.  सूत्रसंचालन प्रा भालचंद्र हुच्चे  आभार प्रदर्शन डॉ. नायगावकर यांनी मानले. 

 
Top