तेर : माळीवाडा,पाथरी जि. परभणी येथील भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी जिल्हा परिषद आंतरराष्ट्रीय शाळेत कार्यरत असलेले पानवाडीचे भूमिपुत्र सोमनाथ पंडितराव डोंगरे यांना जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचा पानवाडी ग्रामस्थांच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला. सोमवारी दि.5 सप्टेंबर रोजी गावातील हनुमान मंदीर सभागृहात हा सत्काराचा कार्यक्रम झाला. 

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सैनिक फुलचंद माने होते. राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर, तेरचे माजी सरपंच महादेव खटावकर, मोहतरवाडी-पानवाडीचे सरपंच राम पांचाळ, उपसरपंच महेश चव्हाण, बिभीषण मुळे, सूर्यकांत ढगे, सचिन गाढवे, अविनाश कदम, आशा कार्यकर्ती संगीता ढगे, महात्मा कदम आदींची प्रमुख उपस्थिती होती.     यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते आदर्श शिक्षक सोमनाथ डोंगरे यांचा आईवडीलासह सत्कार करण्यात आला.               

 यावेळी बोलताना सक्षणा सलगर म्हणाल्या, की पानवाडी सारख्या छोट्याशा गावातील सोमनाथ डोंगरे सर हे परभणी जिल्ह्यात जिल्हा परिषदेची एक शाळा आंतरराष्ट्रीय दर्जाची करण्यासाठी धडपड करतात, त्यांच्या शाळेत गोरगरीबांची 1150 मुले आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण घेतात, ही आपणासाठी अभिमानाची बाब आहे, त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात आला आहे. पानवाडी या छोट्याशा गावाला शिक्षनाचे महत्त्व समजल्याने आज गावात मोठ्या प्रमाणात माजी सैनिक, शिक्षक, इंजिनिअर, खाजगी क्षेत्रात नोकरीत आहेत. पानवाडी येथे मंदिर सभागृहासाठी 5 लाखाचा निधी देण्याचे आश्वासन सलगर यांनी या वेळी दिले.                           

 कार्यक्रमाला श्रीमंत कदम, शिवाजी माने, हरीचंद्र माने, डॉ, लक्ष्मण माने, नारायण साळुंके, धनंजय माळी, श्रीकांत मुळे, पद्माकर खोत, तानाजी कदम, सुभाष कांदे, रेवन कांदे,शरद कदम, नेताजी कदम, दत्तू कांदे, श्रीमंत गाढवे, भगवान माने, रघुनाथ माळी, अर्जुन कांदे, गोविंद डोंगरे, परशराम रायबान, शंकर कदम, बुबासाहेब कदम, रामराव माळी, विजय मुळे, सुरेश कदम, जगदीश सावतर, संजय रसाळ, दत्तू कांबळे यांच्यासह ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.


 
Top