तुळजापूर  / प्रतिनिधी-

 अतिवृष्टी,  लंपी रोगामुळे संकटात सापडलेला  बळीराजाला संकट मुक्त कर, माझ्या महाराष्ट्रावर कृपादृष्टी ठेव, असे साकडे तुळजाभवानीला घातल्याची माहीती  सिनेअभिनेते तथा खा. अमोल कोल्हे यांनी शारदीय नवराञ उत्सवाच्या प्रथम दिनी तिर्थक्षेञी तुळजापूरात येवुन देवीदर्शन घेतल्यानंतर माहीती दिली. 

  मी देविचा भक्त असुन माझा शिवप्रताप गरुडझेप चिञपट ५ तारखेला प्रदर्शित होत आहे.त्यापुर्वी देवीआशिर्वाद घेण्यासाठी आलो. भाविकांचा प्रचड उत्साह बघुन आनंद वाटला.  

दसरा मेळाव्या बाबतीत छञपती शिवाजी महाराज नावावर होत असलेल्या राजकारणा वर बोलाताना म्हणाले की, राजकारण समाजाचा आरसा आहे. कर्तृत्वाचा जोरावर दैवत्वा पर्यत पोहचता येते याचे उत्तम उदाहरण छञपती शिवाजी महाराज आहेत . यावेळी विशाल रोचकरी,  जिवनराजे इंगळे उपस्थितीत होते.


 
Top