उस्मानाबाद / प्रतिनिधी-

तुळजापूर येथे शारदीय नवरात्र महोत्सवात श्री तुळजाभवानी देवीची नित्योपचार पूजा करण्यात आली. शारदीय नवरात्राची आज तिसरी माळ. 

  तत्पूर्वी पहाटे 6 ते सकाळी 10 या वेळेत देवीची अभिषेक पूजा करण्यात आली. त्यानंतर आरती झाली. यापद्धतीने श्री तुळजाभवानी देवीजींचे दररोज विविध धार्मिक विधी विधीवत पार पाडले जातात.  श्री तुळजाभवानी देवीची विविध अलंकार पूजेस दि. 29 सप्टेंबर (उद्या) पासून सुरुवात होत आहे. यात, दि.29 सप्टेंबर रोजी रथ अलंकार महापूजा, दि. 30 सप्टेंबर रोजी मुरली अलंकार महापूजा, दि.01 ऑक्टोबर रोजी शेषशाही अलंकार महापूजा, दि. 02 ऑक्टोबर रोजी भवानी तलवार अलंकार महापूजा आणि दि.03 ऑक्टोबर रोजी महिषासूर मर्दिनी अलंकार महापूजा होणार आहेत.

 तत्पूर्वी रात्री दुसऱ्या माळेच्या दिवशी अभिषेक पूजेनंतर देवीला वस्त्र अलंकार चढविण्यात आला. त्यानंतर धूप आरती करण्यात आली. रात्री श्री तुळजाभवानी मंदिरात वाघ वाहनावरून  छबिना मिरवणूक काढण्यात आली. प्रक्शाळ पूजा झाली. 


 
Top