वाशी/ प्रतिनिधी- 

वाशी येथे १८ सप्टेंबर रोजी  मोफत हाडांची ठिसुळता  तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. हे शिबीर   सुश्रुत किलनिक नवीन तहसील रोड, काशी विश्वनाथ कॉम्प्लेक्स या ठिकाणी होणार असून दुपारी १२ ते ३ या वेळेत रूग्णांची तपासणी केली जाणार आहे.

 सुश्रुत क्लिनिक वाशी  व उषा मेडिकल यांच्या संयुक्त विद्यमाने वाशी येथे 18 सप्टेंबर रोजी मोफत हाडांची सुद्धा तपासणी शिबिर आयोजित करण्यात आलेले आहे. ग्रामीण भागातील अनेक रुग्णांना आपल्या हाडांच्या ठिसूळ ते बाबत शहरातील रुग्णालयात जावे लागते यामध्ये त्यांचा वेळ व पैसा तर जातोच पण विविध त्रास देखील सोसावे लागतात. ही बाब लक्षात घेऊन रुग्णांना काही प्रमाणात दिलासा देण्याच्या उद्देशाने हे शिबीर ठेवण्यात आले आहे.  हे तपासणी शिबीर मोफत असून या ठिकाणी  कसलेही शुल्क आकारले जाणार नाही.  वाशी व तालुक्यातील प्रत्येक गावच्या नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे अवाहन सुश्रुत क्लिनिकचे डॉ.दिग्विजय पाटील यांनी  केले आहे.


 
Top