वाशी/ प्रतिनिधी- 

भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे उस्मानाबाद जिल्हा अधिवेशन कॉ. विठ्ठल सगर, कॉ.रामराव गायकवाड सभागृह समर्थ हॉटेल येथे घेण्यात आले त्याच्या उद्घाटन प्रसंगी देशात अंधकार वाढत असताना  अंधाराच्या ठिकाणी आपण पणती होऊन जाणे  गरजेचे आहे असे मत  रवींद्र केसकर यांनी व्यक्त केले..

  भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे 24 वे जिल्हा अधिवेशन उस्मानाबाद येथे घेण्यात आले. या अधिवेशनाचे  उद्घाटन प्रसंगी   रवींद्र केसकर, मार्गदर्शक कॉ. नामदेव चव्हाण, भाई धनंजय पाटील, प्रतापराव माने,  कॉ. अरुण रेनके ,अड. शीतल चव्हाण हे उपस्थित होते. जिल्हा अधिवेशनाची सुरुवात ध्वजारोहण करून करण्यात आली. 

यावेळी लाल झेंडा जिंदाबाद, भारतीय कम्युनिस्ट पक्ष जिंदाबाद, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. या अधिवेशन स्थळी पक्षातील दिवंगत नेत्यांची नावे सभागृहात दाखवण्यात आली होती... अधिवेशन भागास जिल्ह्याचे माजी खा. उध्दव राव पाटील नगरी, माजी खा. नरसिंहराव देशमुख प्रवेशद्वार अशी नावे देण्यात आली होती .. या अधिवेशनात नवीन जिल्हा कौन्सिल निवडण्यात आली यात जिल्हा सचिव म्हणून कॉ. पंकज चव्हाण यांची सर्वानुमते निवड करण्यात आली तर सहसचिव म्हणून कॉ.सुनीता चावला व अजहर शेख यांच्या निवडीसह 15 जणांची जिल्हा काऊन्सिल निवडण्यात आली. हे अधिवेशन यशस्वी करण्यासाठी शुभम जकाते,शुभम तातुडे, धनंजय गोंदवले, आशिष झोंबडे, केतन इंगळे , समाधान चव्हाण, सुजित चंदनशिवे, शरद गायकवाड, केतन इंगळे, मयूर पवार, अशोक माने , निलेश जाधव , सुदीप जाधव , अजित माळी , क्रांती राऊत  आदींनी परिश्रम घेतले.


 
Top