तुळजापूर   / प्रतिनिधी- 
भारत निवडणूक आयोगाने मतदान ओळखपत्र क्रमांकास आधार क्रमांक जोडणी करण्याच्या मोहिम अंतर्गत तुळजापूर तालुका उस्मानाबाद जिल्हयात प्रथम आला आहे. 
भारत निवडणूक आयोगाने मतदान ओळखपत्र क्रमांकास आधार क्रमांक जोडणी करण्याच्या मोहिम अंतर्गत तुळजापूर तालुक्यातील एकूण २,२५,६० ९ मतदारांपैकी ८ ९ , २१५ इतक्या म्हणजेच ४० टक्के मतदारांच्या मतदान ओळखपत्र क्रमांकास आधार क्रमांक जोडण्यात आले आहेत . या कामामध्ये तुळजापूर तालुका उस्मानाबाद जिल्हयामध्ये प्रथम क्रमांकावर आहे .तसेच   मतदार त्यांचा आधार क्रमांक मतदार ओळखपत्र क्रमांकाशी NVSP.in , Voter Helpline App , वर जाऊन स्वतः जोडणी करुन शकतात, अशी माहीती तहसिलदार  सौदागर तांदळे  यांनी दिली.

 
Top