उमरगा / प्रतिनिधी-

  तालुक्यातील आष्टा (जहागीर) येथे संतयोगी दामोदर मठ संस्थांन येथे मठाधिपती १००८ महंत अवधूतपूरी महाराज यांच्या  स़ंकल्पनेतून श्रावण समारंभामध्ये  श्री राम विजय ग्रंथ सूरु करण्यात आला होता नित्य नेमाने  सदरच्या  ग्रंथाचे वाचन,श्रवण ४० दिवस  सायंकाळी  ६ ते ९ दरम्यान चालू होता त्या ग्रंथाचा समारोप गावातील  प्रमुख मार्गाने  टाळ मृदंगाच्या गजरात नामघोष गजरात  करण्यात आला.

यावेळी  मठाधिपती  १००८ महंत  अवधूतपूरी महाराज  ग्रंथ, वाचक ज्ञानेश्वर गायकवाड,प्रबोधक हिरानाथ गायकवाड, उपसरपंच  बापूराव  गायकवाड, भजनीमंळचे अध्यक्ष  कमलाकर गायकवाड, विश्भर जाधव,विनेकरी रमेश गायकवाड,पांडुरंग गायकवाड गायकवाड, सोनाजी जाधव, उमेश जाधव,  आदिसह  भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top