उमरगा / प्रतिनिधी-

उमरगा शहरातील डॉ. मिनाक्षी डिग्गीकर यांचे शुक्रवारी (ता.२१) रोजी  वयाच्या ४९ व्या वर्षी अल्पशा आजाराने उमरगा येथील राहत्या घरी सकाळी नऊ वाजता निधन झाले. त्यांचे अंत्यसंस्कार दुपारी  दोन वाजता उमरगा येथील लिंगायत स्मशानभुमीत करण्यात आले. 

त्यांच्या पश्चात दोन मुले, पती असा परिवार आहे. उमरगा येथील प्रसिद्ध सर्जन डॉ. लक्ष्मीकांत डिग्गीकर यांच्या पत्नी तथा महाराष्ट्र राज्याचे प्रधान सचिव अनिल डिग्गीकर यांच्या त्या वहीनी होत.

 
Top