तुळजापूर/ प्रतिनिधी-

 श्री तुळजाभवानी मातेचा शारदीय नवराञ उत्सव कोरोना निर्बध मुक्त वातावरणात  व  आगामी निवडणुका पार्श्वभूमीवर  होणार असल्याने नवराञोत्सव काळात भाविकांचा महापूर तिर्थक्षेञ तुळजापूरात येणार आहे.

मागील दोन वर्ष श्रीतुळजाभवानी मातेचा शारदीय नवराञ उत्सव कोरोना पार्श्वभूमीवर बंधनाच्या  वातावरणात संपन्न झाला होता. त्यामुळे तिर्थक्षेञी नवराञोत्सवातभाविक  देविदर्शनार्थ येवु शकले नाहीत. यंदा सर्व निबंध हटवल्याने महाराष्ट्रासह कर्नाटक तेलगंणा गुजरात राज्यातुन मोठ्या संखेने भाविक येवुन दोन वर्ष रखडलेली सेवा वारी पुर्ण करणार आहेत.

तसेच लवकरच महानगर पालिका, नगर पालिका, जिल्हा परिषद ,पंचायत समिती निवडणुक होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर मतदारांना देविदर्शन घडवून देवुन त्यांची मते आपल्या कडे खेण्यासाठी इच्छुक देविजींचे मतदारांना दर्शन मोफत  घडवुन देण्याची मोठी शक्यता असल्याने  इच्छुक उमेदवार यंदा अशा मंडळीना वाहने, नाष्टा, जेवन सोय उपलब्ध करुन मतदारांना देविदर्शन घडवुन त्यांचे मते आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करणार असल्याचा पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवार स्पाँन्सर भाविक लाखोचा संख्यने येण्याची  शक्यता आहे.

   मंञी खासदार -आमदारांची दर्शनार्थ होणार गर्दी !

 महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात राजकिय उलथापालथ होवुन सत्तांतर झाल्याने व नवे मंञीमंडळ आल्याने व कोरोना कालावधीत मंदीर बंद असल्याने मंञी लोकप्रतिनिधी देविदर्शन   घेवू शकले नाहीत अशी व्हीआयपी मंडळी  नवराञोत्सव काळात मोठ्या संखेने  देविदर्शनार्थ येण्याची शक्यता असल्याने यंदा नवराञोत्सवात मंञी आमदार- खासदारांची मंदीयाळी होणार आहे.


 
Top