उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 धाराशिव लोकसभा मतदार संघाचे खासदार  ओम राजेनिंबाळकर यांच्या सततच्या पाठपुराव्याने आणि प्रयत्नाने, राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख  उद्धवजी ठाकरे   यांनी जाहीर केलेल्या धाराशिव लोकसभा मतदारसंघातील लातूर जिल्ह्यातील औसा येथे दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर न्यायालयास आज अखेर राज्य सरकारने मान्यता दिली.

 औसा तालुक्याचा विस्तीर्ण असा विस्तार पाहता औसा तालुक्यातील अनेक गावातील पक्षकारांना न्यायासाठी लातूर या जिल्ह्याच्या ठिकाणी ये जा करावी लागत असून औसा या तालुक्याच्या ठिकाणी दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर न्यायालय स्थापन करणे बाबत औसा विधानसभा मतदारसंघातील नागरिकांसह तालुक्यातील वकील शिष्टमंडळांनी खासदार श्री.ओम राजेनिंबाळकर यांच्याकडे वारंवार मागणी केली होती. त्या अनुषंगाने खासदार श्री. राजेनिंबाळकर यांच्या सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे मा.उच्च न्यायालय, मुंबई यांनी औसा येथे दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर न्यायालय स्थापन करण्यास मान्यता देऊन न्यायालय स्थापन करण्याबाबत तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्याकडे शिफारस केली होती. त्या शिफारशीनुसार तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी सदरील प्रस्ताव मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समितीकडे पाठवला असता उच्चस्तरीय समितीने या प्रस्तावास तात्काळ मान्यता दिली होती. त्यानंतर खासदार श्री.राजेनिंबाळकर यांनी न्यायालय मंजुरी आणि पद निर्मितीस मंजुरी मिळण्याबाबत तत्कालीन मुख्यमंत्री श्री.उद्धवजी ठाकरे साहेब यांच्याशी दि. २७ जुन, २०२२ रोजी पत्रव्यवहार करून विनंती आणि उपमुख्यमंत्री श्री.अजित दादा पवार  , लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री  अमित विलासरावजी देशमुख  यांच्याकडे या मागणीबाबत सातत्याने पाठपुरावा करून औसा येथे दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर न्यायालय स्थापन करण्यास आणि पदनिर्मिती बाबत पाठपुरावा आणि विनंती केली होती. त्यांच्या प्रयत्नाने औसा येथे दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर न्यायालय मंजूर झाल्याबद्दल तालुक्यातील नागरिकांसह वकील शिष्टमंडळांकडून खासदार राजेनिंबाळकर यांचे विषयी कृतज्ञता आणि आभार व्यक्त केले जात आहे.


 
Top