तुळजापूर / प्रतिनिधी-

 उस्मानाबाद जिल्ह्यातील सहकारी पतसंस्था चळवळीत अग्रगण्य असलेल्या समर्थ नागरी सहकारी पतसंस्थेस औरंगाबाद विभागातील 10 ते 50 कोटी ठेवी असलेल्या गटातून दुसऱ्या क्रमांकाचा महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचा सन 2021-2022 चा दीपस्तंभ पुरस्कार प्राप्त झाला आहे.

  हा पुरस्कार गणपतीपुळे या ठिकाणी दिनांक 19 सप्टेंबर रोजी झालेल्या राज्य फेडरेशनच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत संस्थेस महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री  उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली व राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. सदरचा पुरस्कार संस्थेचे संस्थापक चेअरमन नारायण नन्नवरे, व्हा चेअरमन श्रीकांत भोजने सचिव सज्जन जाधव संचालक संजय व्हटकर  श्रीकांत देशमाने, शिवाजी गायकवाड यांनी स्विकारला.

 हा पुरस्कार पतसंस्था चळवळीत दिशादर्शक काम असणार्‍या पतसंस्थांना देण्यात येतो. त्यासाठी संस्थेची ठेव वृध्दी, कर्जवितरण, गुंतवणूक, भागभांडवल, स्वनिधी, नफा लेखापरिक्षण वर्ग, सामाजिक कार्य तसेच करोना काळात ग्राहकांना दिलेली सेवा विचारात घेऊन निवड समितीने संस्थेची पुरस्कारासाठी निवड केली.

 सलग तिसऱ्या वर्षी पतसंस्थेला पुरस्कार मिळाला आहे. संचालक मंडळाचे पारदर्शक कामकाज, सेवक वर्गाची तत्पर सेवा, संक्षेपठेव प्रतिनिधींचे ठेव वृध्दीचे कामकाज इत्यादींच्या कामामुळे हा दीपस्तंभ पुरस्कार मिळाला आहे. पुरस्काराने भविष्यात संस्थेच्या प्रगतीसाठी चालना व प्रोत्साहन मिळाले आहे, अशी प्रतिक्रिया संस्थेचे संस्थापक चेअरमन नारायण नन्नवरे यांनी दिली.

 
Top