उस्मानाबाद  / प्रतिनिधी-

भारतीय सैन्यदलातील शौर्य चक्र सन्मानित सुभेदार बशीर हसन शेख यांच्या 29 व्या शहीद दिनानिमित्त  आज (दि.19) शहरातील भवानी चौक येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करुन श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

 भवानी ग्रुपच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराला युवकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. यावेळी भवानी ग्रुपचे लिंबराज डुकरे, ओमप्रकाश जाधव, इकबाल शेख, रफिक शेख, किशोर डुकरे, पवन स्वामी, सद्दाम तांबोळी, आब्बास शेख, महेबूब शेख, फारुख बागवान, राजू तांबोळी, रवि भोसले, जीवन जाधव, सुनील वाघ, इब्राहीम सय्यद व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.


 
Top