याञा स्पेशल कामगार शहरात दाखल !

 तुळजापूर  / प्रतिनिधी-

 श्रीतुळजाभवानी मातेची मंचकीनिद्रा आरंभ झाल्याने व पावसाने उघड दिल्याने शारदीय नवराञ उत्सवाची पुर्व तयारी जोरात सुरू आहे. 

मंदीर प्रशासन,  पोलिस, नगरपरिषद, आरोग्य, एसटी  विभागावर नवराञोत्सवाची मदार असते. या पार्श्वभूमीवर रविवारी सुट्टीच्या दिवसी ही   अधिकारी -कर्मचारी नवराञोत्सवात कामावर आहेत.  

तसेच पुजारी वृंदानी घरांची रंगरंगोटी स्वच्छता  यात संपुर्ण कुंटुंब गुंतले आहे. पावसाने ओढ दिल्याने कपडे धुण्यासाठी तलावावर शहरवाशीय गर्दी करीत आहेत. तर व्यापारी वर्ग दुकाने भाड्याने करण्याची प्रक्रिया पार पाडुन आता तो ठोक व्यापारी वर्गाकडुन माल घेवुन त्यांची पँकिंग मांडणीत गुंतला आहे.

नगरपरिषद ने सध्या शहरात सर्वञ बँरेकेटींग लावण्याचे  काम सुरु केले आहे.तसेच कचरा उचलणे साफसफाई काम अंतिम टप्यात आले आहे.

पोलिस खात्याने लोखंडी बँरेकेटींग आणले असुन तसेच नवराञोत्सवा पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिस अधिक्षक अतुल कुलकर्णी सह अन्य सहकारी पाँईट वर पाहणी करुन तयारी बाबतीत सुचना करीत आहे. तसेच बंदोबस्तासाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या निवास सोयीसाठी निवासस्थाने शोधणे काम सुरु केले आहे.

विद्युत विभागाने नवराञोत्सवात अखंडीत विद्युत पुरवठा राहावा यासाठी दुरुस्ती कामे युध्द पातळीवर सुरु आहेत. एसटी महामंडळाने बसस्टाँप िफक्स पाँईट करुन तिथे स्वच्छता करीत आहेत. आरोग्य विभागाने औषध साठ्यासह कर्मचारी मागवणे ,  प्रथमोपचार केंद्र उभारणी कामात गुंतले आहेत.एकंदरीत तिर्थक्षेञ तुळजापूर शहरासह आजुबाजुच्या आठ ते दहा गावात नवराञोत्सव पुर्व तयारी जोरात सुरू आहे.

----------------------------------

याञा स्पेशल कामगार दाखल 

 याञा कालावधी करीता काही कामगार  राज्याभर फिरत असतात असे कामगार दाखल होवुन हाँटेल मालकाशी कामाचा  करार करु लागले आहेत. यात स्ञी-पुरुष कामगारांचा समावेश आहे.  यात स्वयंपाकी, वेटर,  आँर्डर घेणाऱ्या कामगारांचा समावेश असुन असे चारशेच्या आसपास कामगार दाखल झाले आहेत. 

 
Top