परंडा / प्रतिनिधी - 

येथील शिव फुले शाहू आंबेडकर चळवळीतील मनोज कोळगे यांची संभाजी ब्रिगेड च्या उस्मानाबाद जिल्हा कार्याध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा अध्यक्ष राहुल बनसोडे यांच्या हस्ते सत्कार करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. 

     यावेळी महाराष्ट्र चॅम्पियन वस्ताद संजय अप्पा काशीद, पत्रकार गणेश राशनकर, राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे तालुका कार्याध्यक्ष  रंगनाथ ओहाळ, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा सरचिटणीस राजाभाऊ जाधव , राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते नासिर शेख, हुसेन शेख, नारायण गायकवाड, शुक्राचार्य वाडेकर, सुरेश माने, हर्षवर्धन पाटील,रणजित नागटिळक, सिद्धांत वाघमारे, ऋषिकेश बनसोडे, ओंकार कोळगे आदी उपस्थित होते.


 
Top