परंडा / प्रतिनिधी -

येथील शिक्षण महर्षी गुरुवर्य रा.गे. शिंदे महाविद्यालयामध्ये बुधवार दिनांक २१ रोजी

 स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्र शिक्षण महर्षी गुरुवर्य रा. गे.शिंदे महाविद्यालय परंडा आणि आयसीआयसीआय बँक यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयातील व तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी कॅम्पस इंटरव्यू घेण्यात आल्या. 

  या मुलाखती घेण्यासाठी सांगली येथील आयसीआयसीआय बँकेचे रिक्रुटमेंट मॅनेजर विवेक आदमाने आणि प्रणव कापसे सहाय्यक मॅनेजर उपस्थित होते. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.त्यांच्या अध्यक्षतेखाली व मार्गदर्शनाखाली या कॅम्पस इंटरव्यू चे आयोजन केले होते. 

यावेळी व्यासपीठांवर स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्राचे चेअरमन डॉ.अरुण खर्डे, संस्कृतीक विभाग प्रमुख डॉ शहाजी चंदनशिवे, वाणिज्य विभागाचे प्राध्यापक डॉ संतोष काळे उपस्थित होते. 

यावेळी उपस्थित होते. मान्यवरांचा सत्कार समारंभ करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ अरुण खर्डे यांनी केले तर अध्यक्ष समारोप प्राचार्य डॉ सुनील जाधव यांनी केले. यावेळी आलेल्या सर्व विद्यार्थ्यांना रिक्रुटमेंट मॅनेजर विवेक आदमाने यांनी मार्गदर्शन केले. यावेळी तालुक्यातून ३१ विद्यार्थ्यांनी मुलाखत दिली.

अध्यक्ष समारोप करताना प्राचार्य डॉ.सुनील जाधव म्हणाले की महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत असताना त्यांना करिअर ऍपॉर्च्युनिटी प्राप्त व्हाव्या यासाठी महाविद्यालयांमध्ये स्वयंरोजगार विभागाच्या वतीने वेगवेगळ्या विभागाच्या माध्यमातून मुलाखती घेऊन विद्यार्थ्यांना स्वतःच्या पायावर कसे उभा राहता येईल यासाठी  मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ.शहाजी चंदनशिवे यांनी केले तर आभार प्राध्यापक डॉ.संतोष काळे यांनी मानले.

 
Top