उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 जिल्ह्यातील नामांकित अशा समर्थ सिटी बिल्डर्सचे संचालक धिरज सुनिल मोटे आणि शेखर शांतिनाथ घोडके यांची महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स,इंडस्ट्रीज अँड अग्रीकल्चरच्या राज्य संचालक पदी नुकतीच निवड करण्यात आलीआहे.

उस्मानाबादकरांसाठी ही एक अतिशय अभिमानाची व आनंदाची गोष्ट आहे.अगदी अल्पावधीतच रिएल इस्टेट, व बांधकाम क्षेत्रात उत्तुंग भरारी घेणारे शेखर घोडके आणि धिरज मोटे हे दोघेही महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स,इंडस्ट्रीज अँड अग्रीकल्चरच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्यात सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न करतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

स्वातंत्र्यपूर्व काळात भारतीय उद्योजकांसाठी ब्रिटीशांशी संघर्ष करणारे व भारताची पहिली स्वदेशी मोटार,पहिले स्वदेशी जहाज व पहिले स्वदेशी विमान निर्माण करणारे दृष्टे उद्योजक शेठ वालचंद हिराचंद यांनी महाराष्ट्रातील लोकांना उद्योग व व्यापारात प्रोत्साहित करण्यासाठी १९२७ साली महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड अग्रीकल्चरची स्थापना केली.शेठ वालचंद हिराचंद यांनी त्यांचे सहकारी आबासाहेब गरवारे,शंतनुराव किर्लोस्कर, बाबासाहेब डहाणुकर यांच्या सोबतीने महाराष्ट्रभर दौरे करून महाराष्ट्राच्या औद्योगिकरणाचा पाया रचला.या चेंबर मार्फत औद्योगिक सहकारी वसाहती,अनेक नवीन रेल्वे सेवा यांच्या बरोबरच राज्यातील जकात रद्द, विविध कर सुधारणा,उद्योग धोरणातील सुधारणा, निर्यात वाढीसाठी प्रोत्साहन योजना यासाठी यशस्वी कार्य केले आहे.

महाराष्ट्राच्या व्यापार-उद्योग क्षेत्राची शिखर संस्था म्हणून गेल्या ९५ वर्षांपासून कार्यरत आहे.या चेंबरच्या स्विकृत संचालकपदी धिरज मोटे व शेखर घोडके यांची नियुक्ती करण्यात आली आहे.त्यांचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे.

 
Top