तुळजापूर / प्रतिनिधी
नवरात्र उत्सवात येणाऱ्या भाविकांची रुग्ण सेवा व्हावी या उद्देशाने वायलन्स फाँर्मा Wallace Pharma, मुंबई व दिलासा जनविकास प्रतिष्ठान औरंगाबाद यांच्या सामाजिक दायित्व निधीतून उपजिल्हा रुग्णालयस वीस हजार औषधे मोफत देण्यात आले .
यात ह्युमिनीटी वाढवणा-या व अँन्टीबायोटीक औषधाचा समावेश आहे.
वायलन्स फाँर्मा Wallace Pharma, मुंबई व दिलासा जनविकास प्रतिष्ठान औरंगाबाद यांच्या सामाजिक दायित्व निधीतून उपजिल्हा रुग्णालय तुळजापूर येथे zimmunity, iverace -kit ही औषधे जवळ जवळ 20 हजार औषधे तालुका रुग्ण कल्याण समितीचे सदस्य आनंद कंदले यांच्या कडे सपूर्द केले . रुग्णालया तर्फे दिलासाचे प्रतिनिधी प्रणव उन्हाळे, विलास राठोड यांचा सत्कार करून आभार मानण्यात आले.
यावेळी डॉ .हनुमंत होंनमाने,वैद्यकीय अधीक्षक,डॉ.श्रीधर जाधव,सर्व वैद्यकीय कर्मचारी,मनोज चव्हाण,श्रीमंत राठोड,दिनेश राठोड,सुजित जमदाडे,चंदू जोगदंड आदी उपस्थित होते.