उस्मानाबाद / प्रतिनिधी/-

धाराशिव साखर कारखाना लि. चोराखळी उस्मानाबादच्या ११व्या गळीत हंगामाचा बाॅयलर अग्निप्रदिपन समारंभास ह.भ.प.प्रकाश बोधले महाराज यांच्या शुभहस्ते करण्यात आला.याप्रसंगी येरमाळ्याचे प्रा.सुनिल पाटील या दाम्पत्यांच्या हस्ते होमहवन पूजा करण्यात आली.

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत देशातील पहिला ऑक्सिजन प्रकल्प उभारलेल्या धाराशिव (उस्मानाबाद) चोराखळी येथील धाराशिव साखर कारखान्याचा दि.२७सष्टेंबर रोजी सकाळी११वा बाॅयलर अग्निप्रदिपन समारंभ वारकारी सांप्रदायिकाचे राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ.प.प्रकाश बोधले महाराज यांच्या शुभहस्ते करण्यात आला.

यावेळी ह.भ.प.बोधले महाराज म्हणाले की; धाराशिव साखर कारखान्यात शेतकरी बांधवांना सन्मानाची वागणूक, योग्य घामाचा दाम आणि अचुक नियोजन आणि त्यांच्या घामाला योग्य दाम दिला जातो. पारदर्शक व नियोजनबद्ध पद्धतीमुळे श्री.अभिजीत पाटील हे एक, दोन नव्हे तर सहा साखर कारखाने यशस्वी पध्दतीने चालवित आहेत. त्याचा कौतुकाचा डंका अवघ्या महाराष्ट्रात गाजत आहे. त्याची यशस्वी कारकिर्दीस शुभेच्छा दिल्या.

गेल्या पाच वर्षापासून शेतकऱ्यांचा विश्वास संपादन केलेल्या कारखान्याने सन२०२२-२३च्या हंगामात ४.लाख ५०हजार प्रति मे.टन गाळप करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्याचबरोबर १कोटी ७५लाख लिटर इथेनॉल निर्मितीवर भर देण्यात येणार आहे. सन२०२१-२२ साली गळीत झालेल्या ऊसाचा तिसरा हप्ता म्हणून १६५प्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येईल असे धाराशिव साखर कारखान्याचे मार्गदर्शक अभिजीत पाटील यांनी घोषित केले. अधिकारी-कर्मचारी व कामगारांनी कारखान्याची वेळेत कामे पुर्ण केली असल्याने त्यांचेही हार्दिक अभिनंदन करत श्री.पाटील यांनी कौतुक केले.

यावेळी केज मा.जि.प.सदस्य सुरेश पाटील, कळंबचे शिवसेना नेते दिलीप पाटील, प्रदीप सस्ते, चरणेश्वर पाटील, सरपंच खंडेराव मैदांड, बाबासाहेब साठे, दिलीप लोमटे, विठ्ठल कारखान्याचे संचालक जनक भोसले, प्रा.कवडे यासह धाराशिव साखर कारखान्याचे संचालक भागवत चौगुले, रणजीत भोसले, संदीप खारे, सजंय खरात, विकास काळे, सुहास शिंदे, व आकाश चिगरे, यासह मल्टीस्टेटचे चेअरमन सुरज पाटील, अर्जुन पाटील, जनरल मॅनेजर पठाण, प्रवीण बोबडे, चिफ इंजिनीअर, केमिस्ट, यासह शेतकरी सभासद, वाहतूक ठेकेदार, कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top