उस्मानाबाद /प्रतिनिधी -

तुळजाभवानीच्या दर्शनाला मी येणारच आहे.मला धाराशिव जिल्ह्याचे कौतुक करायचं आहे कारण कैलासने काय केलं हे सर्वांना माहिती आहे. कैलासने काय पराक्रम केले ते तुम्हा सर्वांना माहिती आहे, ओमराजे देखील कसा रथ पळवताय हे तुम्ही देखील बघितलंय

आताचं जे वातावरण आहे ते भारावून टाकणारे आहे. आई भवानीचा आशीर्वाद असल्यावर कोणी किती अफजल खान आले तरी मला त्याची पर्वा नाही. दसऱ्याला आपण भेटणारच आहोत एक चांगली सुरुवात झाली आहे. दुसरी केस न्यायालयात सुरू आहे, माझा आई भवानीवर आणि सर्वोच्च न्यायालयावर विश्वास आहे. न्याय आपल्याला मिळणार आणि मिळालाच पाहिजे, तुळजाभवानीच्या दर्शनाला मी येणारच आहे. मला धाराशिव जिल्ह्याचे कौतुक करायचं आहे कारण कैलासने काय केलं हे सर्वांना माहिती आहे. कैलासने काय पराक्रम केले ते तुम्हा सर्वांना माहिती आहे, ओमराजे देखील कसा रथ पळवतय हे तुम्ही देखील बघितलंय, तुमच्या आधी जालनाचे लोक आले होते जालनाची परिस्थिती काय आहे सर्वांना माहिती आहे, परिस्थिती काय आहे हे तुम्हाला माहिती आहे अशीच परिस्थिती संपूर्ण महाराष्ट्रात आहे, असं ठाकरेंनी सांगितलं.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद सदस्य दिपक जवळगे, धाराशिव पंचायत समितीचे माजी उपसभापती शाम जाधव, माजी नगरसेवक प्रदिप पिंटू घोणे, गणेश खोचरे, पंकज पडवळ, क्लीन समता ग्रीन समताचे नाना घाडगे, महेश काटे यांनी त्यांच्या असंख्य सहकाऱ्यांसहित शिवसेनेत प्रवेश केला.

यावेळी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर,आमदार कैलास पाटील , माजी नगराध्यक्ष मकरंद उर्फ नंदुभैय्या राजेनिंबाळकर उपस्थित होते.

 
Top