उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 महाराष्ट्र राज्यात अनुसूचित जातीमधील पात्र लाभार्थ्यांसाठी रमाई घरकुल आवास योजना राबविली जात आहे. परंतु या योजनेंतर्गंत दिलेले प्रस्ताव मंजुरीअभावी पडून आहेत. त्या प्रस्तावांना मंजुरी व निधी देण्याची मागणी उस्मानाबाद शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने करण्यात आली आहे.

जिल्हाधिकार्‍यांना शुक्रवार, 16 सप्टेंबर रोजी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, रमाई घरकुल आवास योजनेंतर्गत (शहरी) उस्मानाबाद नगरपरिषद हद्दीतील पात्र लाभार्थ्यांचे प्रस्ताव मागील काही दिवसांपासून मंजुरीअभावी पडून आहेत. त्यामुळे लाभार्थी या लाभापासून वंचित आहेत. तरी या प्रस्तावांना त्वरीत मान्यता व निधी देवून लाभार्थ्यांची हेळसांड थांबवावी व त्यांना हक्काचे घर मिळवून द्यावे, अशी मागणी जिल्हाधिकार्‍यांकडे करण्यात आली आहे.

निवेदनावर काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत पाटील, शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे, ओबीसी विभागाचे जिल्हाध्यक्ष धनंजय राऊत, माजी नगरसेवक तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सिध्दार्थ बनसोडे, सौरभ गायकवाड, अ‍ॅड. जावेद काझी, जमीर सय्यद, सचिन धाकतोडे, प्रेमानंद सपकाळ, अभिमान पेठे, काफिल सय्यद, आरिफ मुलानी आदींच्या सह्या आहेत. 

 

 
Top