उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 शिवसेना हा फक्त एक पक्ष नसून शिवसेना ही सर्वसामान्य मानसांच्या मनात त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी तयार झालेला आणि जनसामान्यांनी मान्य केलेला एक विचार आहे, असे मत धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार  ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी  भुम – परांडा आणि वाशी तालुक्यातील प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गतच्या मंजूर रस्त्याच्या उद्घाटन समारंभाप्रसंगी मांडले. 

  भुम – परांडा आणि वाशी तालुक्यात ३०.१९ कोटी रु. च्या प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत च्या रस्त्यांचा उद्घाटन समारंभ धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार  ओम राजेनिंबाळकर, माजी आमदार  ज्ञानेश्वर पाटील यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला, याप्रसंगी खासदार श्री.राजेनिंबाळकर बोलत होते.

 या प्रसंगी जिल्हाप्रमुख  गौतम लटके  , भुम तालुकाप्रमुख  ज्ञानेश्वर जाधवर, वाशी तालुकाप्रमुख   विकास मोळवणे, परांडा तालुकाप्रमुख  मेघराज पाटील, माजी सभापती शंकर दादा इतापे, शिवाजी मेहर, नगरसेवक अजय वीर, बाळासाहेब उंदरे यांच्यासह नागरीक, पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.


 
Top