तेर / प्रतिनिधी

उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथे कै.डॉ.चंद्रकलादेवी पाटील यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ 12 वी च्या विद्यार्थीनीसाठी घेण्यात आलेल्या 100 मिटर धावण्याच्या स्पर्धेतील विजेत्यांना जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षा अर्चनाताई पाटील यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.

प्रथम विजेती योगेश्वरी खांडेकर, व्दितीय विजेती वैष्णवी वाघ, तृतीय विजेती आरती धुपेकर या विजेत्यांना जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षा अर्चनाताई पाटील यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.स्पर्धेचे आयोजन नरहरी बडवे यांनी केले होते.यावेळी कलाशिक्षक नवनाथ पांचाळ उपस्थित होते.


 
Top