उस्मानाबाद / प्रतिनिधी-

काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना पाठबळ देणारा पक्ष म्हणजे भारतीय जनता पार्टी, असे प्रतिपादन जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी केले. 

   गुरुवार दि १ सप्टेंबर २०२२ रोजी भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे, जिल्हा समन्वय व माजी जि प अध्यक्ष नेताजी पाटिल यांच्या उपस्थितीत धाराशिव येथे बैठक झाली, या बैठकी  दरम्यान भूम शहरातील नगरसेवक रोहन जाधव यांच्यासह अनेक कार्यकर्ते, ग्रामीण भागातील सरपंच, उपसरपंच, सदस्य अशा जवळपास 25 प्रमुख पदाधिकाऱ्यांनी  काँग्रेस आय पक्षातून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला.यावेळी नितीन काळे बोलत होते. 

 यावेळी भुम येथील भाजपाचे जेष्ट नेते बाळासाहेब क्षिरसागर, प्रदेश कार्य.सदस्य.अँड खंडेराव चौरे,जिल्हासरचीटनिस नितीन भोसले,सोशल मिडिया प्रदेश सदस्य पांडुरंग पवार. उपाध्यक्ष धाराशिव न. प.चे माजी गटनेते युवराज नळे. माजी.उपनगराध्यक्ष अभय इंगळे. नगरसेवक राहूल काकडे ,प्रवीण पाठक, तालुका अध्यक्ष महादेव वडेकर, तालुका सरचिटणीस संतोष सुपेकर , भूम शहराध्यक्ष शंकर खामकर यांचेसह असंख्य पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.


 
Top