उस्मानाबाद / प्रतिनिधी-

येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या रामकृष्ण परमहंस महाविद्यालयातील वाणिज्य विभागात शिकत असलेल्या स्वप्नाली मगर या विद्यार्थिनीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या 2020-21 यावर्षी घेण्यात आलेल्या विद्यापीठ परीक्षेमध्ये सुवर्णपदक मिळवल्याबद्दल रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख आणि महाविद्यालय विकास समितीचे सदस्य श्री नानासाहेब पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी स्वप्नाली मगर या विद्यार्थिनीच्या आई-वडिलांचा देखील सत्कार करण्यात आला. 

     याप्रसंगी महाविद्यालयाचे  श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष मा. प्राचार्य अभयकुमार साळुंखे साहेब, सचिव प्राचार्य शुभांगी गावडे मॅडम आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री कौस्तुभ गावडे यांनी स्वप्नाली मगर या विद्यार्थिनीचे अभिनंदन केले.

 
Top