उस्मानाबाद / प्रतिनिधी-

येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिका आणि लोकसभेच्या निवडणुकांमध्ये सर्वसामान्य नागरिक त्यांचा रोष मतदानाच्या माध्यमातून व्यक्त करुन सर्वसामान्यांचा जनाधारा डावलून आज सत्तेमध्ये असलेल्या प्रत्येकाला जनता घरी बसवेल, सद्याच्या सरकारवर जनतेचा तीव्र रोष , असे प्रतिपादन खा. ओमराजे यांनी केले. 

  ग्रामपंयायत कार्यालय, मस्सा (खं.) यांच्या वतीने गावामध्ये मंजूर झालेल्या विकासकामांच्या लोकापर्ण व भूमीपूजन समारंभास खासदार श्री. ओमप्रकाश राजेनिंबाळकर व जिल्हाप्रमूख तथा आमदार श्री.कैलास दादा घाडगे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मंजुर विकासकामांचे लोकापर्ण झाले. यावेळी ते बोलत होते. 

   याप्रसंगी माजी नगराध्यक्ष श्री.नंदु राजेनिंबाळकर, तालूकाप्रमुख  शिवाजी अप्पा कापसे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक  संजय बाबा देशमूख,  विश्वजीत जाधव, संचालक  बळवंत बप्पा तांबारे,  सौ.राजश्री  वरपे  ,  चरण पाटील,  कांबळे साहेब, लक्ष्मण आडसूळ,  .सागर बाराते,  मनोहर धोंगडे,  विश्वनाथ तांदळे,  विष्णू बांगर, अनिल वरपे,  नितिन सावंत, सौ.संगीता शिंदे, श्री.मेटकरी सर,  धनंजय वरपे,  दादा थोरात,  अरूण आबा वरपे, गटविकास अधीकारी  चकोर साहेब यांच्यासह नागरीक, पदाधीकारी आणि शिवसैनीक उपस्थीत होते.


 
Top