तुळजापूर / प्रतिनिधी-

महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्रीतुळजाभवानी मातेची  पालखी राहुरीवरून सिम्मोलंघन सोहळ्यासाठी  रविवार दि. ११ रोजी तिर्थक्षेञ  तुळजापूरकडे  रवाना करण्यात आली. 

 माजी आमदार शिवाजी कर्डिले यांच्या हस्ते पुजन करून तुळजाभवानी मातेचे पालखीचे पुजारी सागर भगत ,सुदाम भगत , बालू भगत , शिवराम  भगत , संदीप भगत , देविदास भगत , वसंत भगत , निलेश भगत ,सुरेंद्र भगत , निखिल भगत  तेली समाज अध्यक्ष संजय पन्हाळे , राजू रणसिंग यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला.

 देविजींचा सिमोल्लंघन सोहळ्यासाठी लागणारी पालखी तयार करण्याचा  व आणण्याचा  अनेक समाजाचा सहभाग आहे

 दरवर्षी  पालखीसाठी लागणारे उभे लाकूड माळी  म्हेत्रे   इतर कामासाठी सागवान व बोरीचे लाकूड पटेल सा मील कडून घेतले जाते.. खांद्यासाठी जो मोठा दांड लागतो तो पुर्वीचा जुनाच वापरला जात असतो . संपुर्ण लाकूड गोळा झाल्यानंतर ती पालखी तयार करण्याचा मान कै . उमाकांत सुतार घराण्याकडे असून सध्याचे त्यांचे वंशज अरुण सुतार हे आहेत . लाकडाची कतई करण्याचे काम धनगर समाजाचे भांड घराणे तर खिळेपट्टी करण्याचे काम हे लोहाराचे पुर्वीचे रणसिंग घराण्याकडे असून सध्याचे बापूराव रणसिंग , काशिनाथ रणसिंग , व गोरख रणसिंग हे करत अाहेत. . संपूर्ण पालखी तयार झाल्यावरती खण नारळानी पालखीची ओटी भरून भंडा - याची उधळण करून मोठ्या जयघोषात पालखी राहूरी हुन  ती तुळजापूरला  रवाना केली  जाते

 तुळजापूरात  आल्यानंतर  शहरातील  शुक्रवार पेठेत पलंग पालखी कट्ट्यावरती जानकोजी भगत यांच्या समाधी शेजारी आणली जाते. येथे  पलंग व पालखीची पुजा झाल्यानंतर मंदिर संस्थानकडून  मानाचा १ रूपया व नारळ देवून सिम्मोलंघनासाठी आमंत्रण दिले जात असत . मग ही पालखी वाजत गाजत साधारण ४ पर्यंत मंदिरात येते, व या पालखीत देविजींचा सिमोल्लंघन सोहळा संपन्न होतो.


 
Top