उस्मानाबाद / प्रतिनिधी-

  देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस 17 सप्टेंबर आणि महात्मा गांधी यांची जयंती 2 ऑक्टोबर या कालावधीत भारतीय जनता पार्टीच्या वतीने सेवा पंधरवाड्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कालावधीत भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखालील सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनांची माहिती व लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्याचे काम भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते करणार आहेत. विविध चर्चासत्रे, व्याख्यान, तसेच योजनेच्या लाभार्थ्यांशी संवाद साधण्यात येणार आहे, अशी माहिती  भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य किशोर शितोळे यांनी आज दिली.

 सेवा पंधरवड्यानिमित्त 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत उस्मानाबाद जिल्ह्यात लोकनेते आमदार राणाजगजितसिंह पाटील, मा. आमदार सुजितसिंह ठाकूर यांचा नेतृत्वाखाली व भाजप जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. या कामांच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य किशोर शितोळे हे सोमवारी उस्मानाबाद येथे आले असता त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

 श्री.शितोळे यांनी विविध अभियानाची माहिती सांगितली ,सेवा पंधरवडा कालावधीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने घेतलेल्या लोकोपयोगी निर्णय व योजनांची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचवायची आहे. त्याकरिता चर्चासत्र, मेळावे, उज्ज्वला योजना, आत्मनिर्भर योजना, वयोश्री योजना, दिव्यांगांसाठीच्या योजनांची जनजागृती करुन गरजूपर्यंत योजनेचा लाभ पोहचवावा. त्याचबरोबर डॉक्टर, वकील, व्यापार, उद्योग अशा अनेक क्षेत्रातील तज्ज्ञांचे चर्चासत्र आयोजन करण्यात यावे, सरकारच्या योजनांचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांची मनोगते नोंदवून घ्यावीत. त्याचबरोबर कोविड लसीकरण मोहिमेची माहिती घेऊन गावोगावी आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन करणे, खादी उत्पादनाला चालना देण्यासाठी जनजागृती करणे, जल साक्षरता वाढविण्यासाठी जलायशांची स्वच्छता व संवर्धन मोहीम राबविणे, वयोश्री योजना व दिव्यांगांच्या योजनांचा लाभ गरजुपर्यंत पोहचविण्याचे आवाहन त्यांनी केले. त्याचबरोबर स्वच्छता अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्याबरोबरच त्यात सातत्य ठेवण्याचा संकल्प सेवा पंधरवड्यात करावा, असेही त्यांनी सांगितले.त्याचबरोबर  भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने संपूर्ण जिल्ह्यात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे .

 यावेळी भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर,  भाजप सरचिटणीस ॲड नितीन भोसले, प्रदीप शिंदे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष इंद्रजित देवकते, मा.गटनेते युवराज नळे, बप्पा वाघमारे, शहर अध्यक्ष राहुल काकडे, भाजयुमो तुळजापूर तालुकाध्यक्ष आनंद कंदले, प्रीतम मुंडे, रोहन जाधव, राजगुरू कुकडे, दयानंद मुडके, राहूल साठे, रोहित देशमुख, शंकर मोरे, आदीसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

 
Top