परंडा / प्रतिनिधी - 

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेळगाव ता.परंडा येथिल शिक्षिका ज्योती देशमुख यांनी शैक्षणिक कार्यातील उल्लेखनीय कामगिरी केल्या बद्ल ज्ञानज्योती बहुउद्देशीयसंस्था,

टाकळीभान तालुका श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर या संस्थेने राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित केले.

 पद्मश्री पुरस्कार भारत सरकार प्राप्त राहीबाई पोपेरे, पारनेर विधान सभा मतदार संघाचे आमदार निलेश लंके,माजी शिक्षण संचालक दिनकर टेमकर, श्रीरामपूर तालुका गटशिक्षणाधिकारी शबाना शेख यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र देऊन ज्योती देशमुख यांना त्यांचे शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी बद्दल गौरविण्यात आले.

याप्रसंगी प्रहार जिल्हाध्यक्ष वैजीनाथ सावंत, जिल्हा कोषाध्यक्ष रघुनाथ दैन,आई हौसाबाई देशमुख,भाऊ संजय देशमुख,विजय देशमुख, जयश्री देशमुख,अनिता देशमुख,पायल देशमुख,साहिल देशमुख,समीर डगळे,ओम देशमुख, प्राध्यापक आनंद गवारी, वनिता गवारी,सुधीर बो-हाडे, गोविंद देशमुख, शोभा लांडगे मॅडम,बीना सावळे, तसेच वाघ, साबळे मॅडम आदि मान्यवर उपस्थित होते.

 
Top