उस्मानाबाद / प्रतिनिधी-

दिनांक 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिनाचे निमित्ताने पुणे येथील जागृती फाउंडेशन तर्फे स्वाधार मधील महिला शिक्षक तसेच कर्मचाऱ्यांना मोफत सॅनिटरी नॅपकिन चे  वाटप करण्यात आले. मागील 3 ते 4 वर्षापासून सदरील संस्था स्वाधार मतिमंद मुलींचे बालगृह, मु. पो. आळणी, (ता. जि. उस्मानाबाद) शाळेतील सर्व मुलींसाठी नियमितपणे सॅनिटरी नॅपकिन चा पुरवठा करत असते. स्वाधार चे समन्वयक रेणुका कुदळे व गांधी मेडिकल स्टोअर्स चे कुणाल गांधी यांचे सहकार्य या उपक्रमास लाभते. 

 लातूर माहेर असणाऱ्या सौ. स्वानंदी देशमुख-रथ यांनी स्थापन केलेली जागृती फाउंडेशन, पुणे ही संस्था महिलांसाठी निरनिराळ्या सामाजिक उपक्रमात नेहमी अग्रेसर असते. महिला दिन, स्वातंत्र्य दिन, अपंग दिन अशा विविध दिनाच्या माध्यमातून वर्षभर अनेक उपक्रम संस्थे तर्फे पुणे परिसर व मराठवाड्यात राबविले जातात. 

 स्वाधार चे संचालक शहाजी चव्हाण, मुख्याध्यापक गुरुनाथ थोडसरे, सर्व महिला शिक्षक आणि कर्मचारी वृंद यांच्यातर्फे जागृती फाउंडेशन चे आभार व्यक्त केले.

 
Top