उस्मानाबाद / प्रतिनिधी-

पीकविमा कंपनी व कृषी कार्यालयाकडून शेतकऱ्यांना विमा मिळण्यासाठी ऑनलाइन तक्रारी करण्याचे सांगण्यात येत आहे. अनेक शेतकऱ्यांना ऑनलाईन प्रक्रिया जमत नसल्यामुळे ते पीकविम्याच्या लाभापासून वंचित राहात आहेत. त्यामुळे ऑनलाईन तक्रारीची जाचक अट रद्द करण्याची मागणी वाशी तालुका शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. 

 निवेदनावर शेतकरी संघटनेचे वाशी तालुकाध्यक्ष दादासाहेब चेडे, तालुका उपाध्यक्ष विलासराव देशमुख, तालुका कार्याध्यक्ष वसंतराव कवडे, तालुका संघटक भारत मोळवणे, वसंतराव कवडे, शिवाजीराव उंद्रे, जगन्नाथ घुले आदींची स्वाक्षरी आहे.


 
Top