उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 जिल्ह्यातील निर्यात वृध्दी, उद्योग विषयक गुंतवणूक वृध्दी, एक जिल्हा एक उत्पादन आणि व्यवसाय सुलभीकरणासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली एकदिवसीय कार्यशाळा आयोजित केली आहे.

 या कार्यशाळेत निर्यात विषयक तज्ञाचे मार्गदर्शन होणार आहे. तरी जिल्ह्यातील निर्यातदार, निर्यातक्षम उद्योजक, नवउद्योजक, प्रगतीशील शेतकरी, शेतकरी सहकारी संस्था, शेतकरी उत्‍पादक कंपनी यांनी दि.28 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 10.00 ते 05.00 या वेळेत डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे या कार्यशाळेत हजर राहण्यास जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक यांनी आवाहन केले आहे.


 
Top