उस्मानाबाद / प्रतिनिधी-

  भाजपा ओबीसी मोर्चा धाराशिवच्या वतीने  नरेंद्र मोदी  यांच्या वाढदिवसानिमित्त कुष्ठधाम येथील रुग्णांना व पालावरती राहणाऱ्या लोकांना, तसेच लहान मुलांना फळ वाटप करण्यात आले. यावेळी भाजप ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष श्री विजय शिंगाडे आणि भाजपा जिल्हा उपाध्यक्ष श्री इंद्रजीत   देवकते यांच्या हस्ते वरील दोन्ही ठिकाणी फळ वाटप करण्यात आले.

 यावेळी ओबीसी मोर्चा जिल्हा सरचिटणीस तानाजी वाघमारे, ओबीसी मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष सतीश वैद्य, राम लवटे, ओबीसी मोर्चा जिल्हा सचिव सावता माळी, साहेबराव पाटोळे, धाराशिव शहराध्यक्ष ज्ञानेश्वर सूळ, दादा घोडके तसेच इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


 
Top