तुळजापूर / प्रतिनिधी-

 धाराशिव जिल्हयाचे पालकमंञी तथा  आरोग्य मंञी तानाजी सावंत यांच्या उपस्थितीत  श्री तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतल्यानंतर शिवसेना तालुका कार्यालयात शहरासह अनेक गावातील युवकांनी शिवसेनेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला.

धाराशिव रोडवरील तालुका  शिवसेना  संपर्क कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमास जि.प.सदस्य दत्ता सांळुके  जिल्हाध्यक्ष  सुरज सांळुके, जिल्हाध्यक्ष  मोहन पेनुरे, धनंजय पाटील सह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थितीत होते. यावेळी तुळजापूर शहर, तुळजापूर खुर्द ,मोर्डा, काक्रंबावाडी येथील युवकांंनी  शिवसेना नेते  पालकमंञी तथा आरोग्यमंञी तानाजी सावंत यांच्या हस्ते तालुकाध्यक्ष संभाजी पलंगे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला.


 
Top