उस्मानाबाद / प्रतिनिधी-

उस्मानाबाद पोलीस दलातील पोलीसांच्या कार्यास प्रोत्साहन देण्याच्यासाठी  पोलीस अधीक्षक  अतुल कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून उत्कृष्ट कामगीरी करणाऱ्या पोलीसांचा सत्कार करण्यात आला.

यामध्ये जुलै 2022 या महिन्यात  बेस्ट पोलीस स्टेशन- परंडा पोलीस स्टेशन, बेस्ट उपविभाग- कळंब उपविभागाचे   सहायक पोलीस अधिक्षक एम. रमेश, चांगला तपास  स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि  मनोज निलंगेकर, पोलीस अंमलदार- जावेद काझी, प्रकाश औताडे, उलीउल्ला काझी, विशाल गायकवाड, शैला टेळे यांनी येरमाळा पो.ठा. गुरनं 201/2022 भा.दं.सं. कलम- 379 हा चोरीचा गुन्हा उघडकीस आणला, चांगली दोषसिध्दी- उमरगा पो.ठा. चे पोनि-  एम.ए. राठोड, पोउपनी-   व्ही.एन. वाघ, पोलीस अंमलदार- पी.ए. बांगर यांनी उमरगा गुरनं 337/2018 भा.दं.सं. कलम- 302, 498 (अ) या खूनाच्या गुन्ह्यात अपराध सिध्‍दी करीता योगदान िदल्याने आरोपीस मा. न्यायालयाने कलम-302 मध्ये जन्मठेप व 5,000 ₹ व कलम-498 (अ) मध्ये 2 वर्षे कारावास व 3,000 ₹ दंडाची शिक्षा सुनावल, समन्स- वॉरंट तामील- अंबी पो.ठा. चे पोलीस अंमलदार- बी.व्ही.सोनटक्क, चांगले सीसीटीएनएस काम- उस्मानाबाद (श.) पो.ठा. चे पोलीस अंमलदार- दिपाली झोरी, नागींद्रा मडावी, अंजु अडसू, चांगला मुद्देमाल हस्तगत- स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि-  मनोज निलंगेकर, पोलीस अंमलदार- साखरे, काझी, औताडे यांनी उस्मानाबाद (ग्रा.) गुरनं 152/2022 भा.दं.सं. कलम 379 या चोरीच्या गुन्हयातील 9 मोबाईल फोने हस्तगत केले. चांगला मुद्देमाल निर्गती- कळंब पो.ठा. चे पोलीस अंमलदार- शिवाजी राऊत यांनी एकूण 76 गुन्ह्यातील मुद्देमालाची निर्गती केली. जास्तीत- जास्त मिसिंग निर्गती- नळदुर्ग पो.ठा. च्या पोलीस अंमलदार- एस.एस. शिंदे यांनी 11 मिसींग प्रकरणाचा तात्‍काळ शोध घेतला. जास्तीत- जास्त प्रतिबंधक कारवाई- कळंब पो.ठा. चे पोनि- श्री. यशवंत जाधव यांनी 115 आरोपीतांवर प्रतिबंधक कारवाई केली. बेस्ट कम्युनिटी पोलीसिंग- उस्मानाबाद (श.) चे पोलीस अंमलदार- एस.एस. स्वामी, ए.डी. सारफळे यांनी चांगली कामगिरी केली .चांगले कामकाज करणारे पोलीस- कळंब पो.ठा. चे पोनि-   यशवंत जाधव , चांगला प्रतिसाद डायल 112- नळदुर्ग पो.ठा. चे सपोनि- श्री. एस.आर. गोर, बेस्ट क्लर्क-  नरुटे कनिष्ठ श्रेणी लिपीक, विभागीय चौकशी शाखेचे कामकाज वेळेत पारपाडून चांगली कामगिरी केली.

  वरील सर्व पोलीस अधिकारी, अमंलदार व लिपीक यांचा  पोलीस मुख्यालयातील सभागृहाते  पोलीस अधीक्षक  अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देउन सत्कार करण्यात आला. यावेळी पोलीस अधिकारी- अंमलदार उपस्थित होते.


 
Top